‘जिनके घर शिशेके…’, नासाच्या प्रतिक्रियेचा आनंद महिंद्रांनी घेतला समाचार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानने यशस्वी चाचणी केलेल्या मिशन शक्तीमुळे झालेल्या कचऱ्यामुळे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचा धोका वाढल्याचे नासाने म्हटले आहे. नासाच्या या प्रतिक्रियेची हिंदुस्थानचे उद्योजक आनंद महिद्रा यांनी फिरकी घेत टीका केली आहे. आनंद महिंद्रा यांनी अमरिकेलेला हिप्पोक्रेट असे म्हटले आहे.

‘मिशन शक्ती’मुळे नासाच्या डोक्याला ताप, अंतराळ कचऱ्याचा जागतिक स्पेस कार्यक्रमांना धोका

अंतराळातील उपग्रह क्षेपनास्त्राच्या सहाय्याने नष्ट केल्यानंतर हिंदुस्थानचे देशभरातून कौतुक होत असताना अमेरिकेची अंतराळ संसोधन संस्था नासाने यातील गंभीर बाबींवर प्रकाश टाकला होता. यानंतर आनंद महिंद्रा यांनी ट्वीट करत नासा आणि अमेरिकेवर आगपाखड केली. गेल्या काही दशकांमध्ये अमेरिकेने अंतराळात सर्वात जास्त कचरा केला आहे. त्यामुळे त्यांच्याकडून अशी प्रतिक्रिया येणे नक्कीस साहशी आहे. तसेच एका इंग्रजी म्हणीचाही त्यांनी येथे वापर केला. महिंद्रा यांचे ट्वीट हजारो लोकांनी लाईक आणि रिट्विट केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 27 मार्चला देशाला संबोधित करताना हिंदुस्थानने अंतराळात 300 किलोमीटर अंतरावर असणारा उपग्रह क्षेपनास्त्राने उडवल्याची माहिती दिली. यासाठी त्यांनी वैज्ञानिकांचे कौतुक केले. अशी कामगिरी करताना हिंदुस्थान अमेरिका, रशिया आणि चीननंतर चौथा देश ठरला होता. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर नासाने हिंदुस्थानच्या या यशस्वी चाचणीमुळे अंतराळात 400 तुकडे परसले असून याचा आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला धोका असल्याची प्रतिक्रिया दिली होती.