सिडकोत 160 बेडचे कोरोना रुग्णालय

प्रातिनिधिक फोटो

शिवसेना महानगरप्रमुख, नगरसेवक सुधाकर बडगुजर यांच्या प्रयत्नातून महापालिकेच्या सहकार्याने सिडकोत एकशेसाठ बेडचे कोविड सेंटर तयार करण्यात आले. येथे खासगी डॉक्टरांचीही मदत घेण्यात येणार आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव या रुग्णालयाला देण्यात आले आहे.

नाशिक शहरात कोरोना रुग्णांना बेड मिळत नाहीत. ऑक्सिजन बेडचा मोठय़ा प्रमाणात तुटवडा भासत आहे. नवीन नाशिक सिडकोत सावतानगरच्या क्रॉम्टन हॉल येथे 46 ऑक्सिजन व 14 आयसीयू बेडचे आणि रायगड चौकातील महापालिका शाळेत सर्वसाधारण कोरोना रुग्णांसाठी शंभर बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. नऊ खासगी डॉक्टरांची येथे मदत घेतली जाईल. महापालिकेचे डॉक्टर, नर्सेस, वॉर्डबॉय व इतर कर्मचारीवर्ग राहणार आहे. सिडकोतील पाटीलनगर, सावतानगर, पवननगर, त्रिमूर्ती चौक यासह परिसरातील रुग्णांना येथे तातडीने उपचार घेणे शक्य होणार आहे, अशी माहिती सुधाकर बडगुजर यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या