
कोरोनाचा संसर्ग वाढल्याने नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी पुन्हा एकदा आयुक्तालयात कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी पोलीस कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. सकस आहार, योगा, प्राणायाम, वॉक टेस्ट, उपचारपद्धती यासोबतच दोन वेळा सूर्यस्नानावर भर दिला जात आहे. हे सूर्यस्नान कोविडबाधितांसाठी गुणकारी ठरत असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचे समोर आले आहे.
शहरात कोरोना संसर्ग वाढल्याने 23 मार्चपासून पोलीस कोविड केअर सेंटर पुन्हा सुरू झाले. येथे शंभर बेड असून 1 हजार 8 कर्मचाऱयांची ऑण्टिजेन चाचणी झाली आहे. त्यातील 262 बाधितांपैकी 90 जणांवर उपचार करण्यात आले. 69 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले असून सध्या 21 रुग्ण उपचार घेत आहेत. दीपक पाण्डेय यांनी वैद्यकीय तज्ञांशी चर्चा करून रुग्णांना योग्य उपचार मिळावेत याकडे पूर्ण लक्ष पेंद्रित केले. येथे नियमितपणे सकाळी आणि संध्याकाळी रुग्ण सूर्यस्नान घेतात.
अशी आहे उपचार पद्धती
आहारात नाष्टय़ामध्ये केळी, द्राक्षे; दुपारच्या जेवणात वरण, वरईचा भात, नाचणीची भाकरी, हळद आणि काळी मिरी टापून उकडलेल्या भाज्या, सॅलड; रात्री केळी, द्राक्षे अशी फळे, हळद आणि काळी मिरी पावडरचे दूध यांचा समावेश आहे. त्याचबरोबर अनुलोम-विलोम, दैनंदिन योगा, सूर्यनमस्कार, जलनेती, संक्षिप्त योगनिद्रा यावरही लक्ष दिले जात आहे.
मागील वर्षी 198 जणांवर उपचार
मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये कोविड योद्धे असलेल्या पोलीस दलाला कोरोनाने ग्रासले होते. त्यावेळी नुकतेच रुजू झालेले पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी तत्काळ पोलिसांच्या हक्काचे कोविड केअर सेंटर पोलीस आयुक्तालयात सुरू केले. त्यावेळी 198 अधिकारी, कर्मचारी आणि नातेवाईकांवर उपचार करण्यात आले.


























































