नाशिकमध्ये अवकाळी पाऊस, वातावरणात आला गारवा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
nashik-rain

गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात आभाळ भरून यायचं, प्रचंड उकाडा जाणवायचा मात्र पाऊस काही पडत नव्हाता. बुधवारी दुपारी साडेतीन-चारच्या सुमारास मात्र नाशिक शहराच्या काही भागांमध्ये ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली.

शहरातील द्वारका, तपोवन, गांधीनगर, उपनगर या भागात पावसाने हजेरी लावली. हलक्या सरींसह पडलेल्या पावसानंतर वातावरणात गारवा आणि नाशिकरांची उकाड्यातून काही काळ सुटका झाली. या भागात काही काळ वीज पुरवठा बंद झाला होता. काही भागात इंटरनेटही डाऊन झालं.


View this post on Instagram

A post shared by Saamana (@saamanaonline)

याआधी पुण्यासह पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात अवकाळी पावसानं हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं होतं.