
पटियाला सेंट्रल जेलमध्ये शिक्षा भोगत असलेले माजी क्रिकेटपटू आणि राजकीय नेते नवज्योतसिंग सिद्धू यांची प्रकृती बिघडल्याने सोमवारी त्यांना चंदीगडच्या पीजीआयएमईआरमध्ये दाखल केले आहे. यकृताच्या समस्येनंतर सिद्धू यांना सोमवारी दुपारी रुग्णालयात तपासणीसाठी नेले. दरम्यान, सिद्धू यांची प्रकृती स्थिर असून त्यांना निरीक्षणाखाली ठेवल्याची माहिती रुग्णालयाने दिली.


























































