छत्तीसगडमध्ये नक्षली हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

छत्तीसगडच्या विजापूरमध्ये काँग्रेस आमदाराच्या 15 गाडय़ांच्या ताफ्यावर नक्षल्यांनी हल्ला केला. आमदार विक्रम मंडावी हे जिल्हा परिषद सदस्यांसह गंगालूरला गेले होते. मंगळवारच्या आठवडी बाजारात येथे नुक्कड सभेचे आयोजन करण्यात आले होते. परतताना पदेडा गावाजवळ नक्षल्यांनी वाहनावर गोळीबार केला. सुदैवाने ताफ्यातील सर्वजण सुरक्षित आहेत.