2700 रुपयांचा शेअर 11 रुपयांवर आला, अचानक किंमत झाली शून्य; गुंतवणूकदारांचे काय होणार?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शेअर बाजाराची माहिती नसतानाही अनेकदा लोकं भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेतात आणि गुंतवणूक करतात. यामुळे बऱ्याचदा नुकसानच सहन करावे लागते. असेच अंबानींच्या एका शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसोबत झाले आहे. कारण या शेअरची किंमत शून्य रुपये झाले आहे.

अनिल अंबानी यांची कर्जात बुडालेल्या रिलायन्स कॅपिटल (Reliance Capital Share) या कंपनीला एसीएलटीद्वारे हिंदुजा समुहाच्या इंडसइंड इंटरनॅशनल होल्डिंग्जने विकत घेतले. नव्या मालकाने ‘रिलायन्स कॅपिटलल’ला शेअर बाजारातून डी-लिस्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे शेअर बाजारामध्ये रिलायन्स कॅपिटलच्चा शेअरमधील खरेदी-विक्री बंद झाली आहे.

रिलायन्स कॅपिटलच्या शेअरमध्ये अखेरचे ट्रेडिंग 26 फेब्रुवारी 2024 रोजी झाले होते. त्या दिवशी शेअरची किंमत 11.90 रुपये होती. मात्र तेव्हापासून गुंतवणूकदारांना ना शेअर खरेदी करता येतायंत, ना विकता येत आहेत. अर्थात ज्यांच्याकडे रिलायन्स कॅपिटलचे शेअर आहेत त्याची किंमत शून्य झाली आहे. त्यांचा सगळा पैसा बुडाला आहे.

26 फेब्रुवारी 2024 ला रिलायन्स कॅपिटलची किंमत 11.90 रुपये होती. डी-लिस्टनंतर शेअरची किंमत शून्य झाली असून आता गुंतवणूकदार हा शेअर विकू शकणार नाहीत आणि नव्याने खरेदी करूही शकणार नाहीत. त्यामुळे गुंतवणूकदारांना काहीही परतावा मिळणार नाही. अर्थात हे सर्व सेबीच्या नियमानुसार झालेले आहे. शेअर खरेदी करताना अनेकदा मेसेज येतो आणि ज्या कंपन्यांचे प्रकरण NCLT मध्ये सुरुय त्यापासून सावध राहण्यास सांगितले जाते.

एकेकाळी होता 2700 रुपये भाव

अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कॅपिटल या शेअरची किंमत एकेकाळी 2700 रुपये होती. मात्र कर्जाच्या जाळ्यात अडकल्यामुळे अंबानींचा हा शेअर जवळपास 99 टक्के खाली घसरला होता. 29 नोव्हेंबर 2021 रोजी आरबीआयने अंबानींच्या या कंपनीचे संचालक मंडळ बरखास्त केले होते. त्यानंतर NCLT प्रक्रियेद्वारे ही कंपनी हिंदुजा समुहाच्या इंडसइंड इंटरनॅशनल होल्डिंग्स कंपनीने खरेदी केली. कंपनीचा ताबा मिळताच हिंदुजा समुहाने रिलायन्स कॅपिटलचे शेअर डी-लिस्ट करण्याचा निर्णय घेतला. या डी-लिस्टिंगनंतर गुंतवणूकदारांना ना हिंदुजा समूह पैसे देणार ना, रिलायन्स कॅपिटने कोणती ऑफर दिली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचे सर्व पैसे बुडाले आहेत.