हा निर्णय महाविकास आघाडीची ताकद वाढवणारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशातील नेते व कार्यकर्त्यांचा आग्रह मान्य करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी राहाण्याचा शरद पवार यांचा निर्णय माझ्यासह पक्षाच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवणारा आणि महाविकास आघाडी व देशातील विरोधी पक्षांच्या एकजुटीला बळ देणारा आहे अशा शब्दात विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी भावना व्यक्त केल्या.

शरद पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम राहण्याचा निर्णय आपल्या सर्वांच्या आग्रहाखातर घेतला असून त्यांचे वय आणि प्रकृतीची काळजी घेऊन आपण सर्वांनी येणाया काळात अधिक जबाबदारी उचलावी, एकजुटीने आणि अधिक जोमाने काम करावे, त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक मजबूत करावा, असे आवाहनही अजित पवार यांनी केले आहे.