Asian Games: ऐतिहासिक! नीरज चोप्राची पुन्हा सोनेरी कामगिरी, किशोर जेनाने जिंकलं रौप्यपदक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आशियाई क्रीडा स्पर्धेत हिंदुस्थाननं ऐतिहासिक कामगिरी केली आहे. हिंदुस्थानच्या भालापटूनं नीरज चोप्रानं पुन्हा सोनेरी कामगिरी करत सुवर्ण पदक कमावलं आहे. तर किशोर जेनाने जिंकलं रौप्यपदकाची कमाई केली आहे.

दोन हिंदुस्थानींचा समावेश असलेल्या भालाफेकीच्या अंतिम सामन्यात नीरज चोप्रानं आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण कामगिरी केली. तर उदयोन्मुख भालाफेकपटू किशोर जेनाने रौप्यपदक जिंकलं.

अन्नू राणीने महिला भालाफेकीत सुवर्णपदक जिंकल्याच्या एका दिवसानंतर नीरज आणि जेना यांनी अंतिम फेरीत सुवर्ण आणि रौप्यपदकासाठी झुंज दिल्यानं हांगझोऊ येथील नॅशनल स्टेडियममध्ये हिंदुस्थानची कामगिरी चमकदार झाली आहे.