NEET पेपरफुटी प्रकरणी CBI ची मोठी कारवाई, पाटणा येथून चार डॉक्टरांना केली अटक

नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय अन्वेषण ब्युरोने मोठी कारवाई केली आहे. सीबीआयच्या पथकाने गुरुवारी 18 जुलै रोजी पेपरफुटी प्रकरणाशी संबंधित 4 विद्यार्थ्यांना अटक केली आहे. चारही विद्यार्थ्यांना बिहारची राजधानी पाटणा येथून अटक करण्यात आली आहे. हे चारही विद्यार्थी पाटणा येथील एम्समध्ये शिकणारे एमबीबीएसचे विद्यार्थी आहेत.

सीबीआयच्या माहितीनुसार, एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षाचे तीन विद्यार्थी चंदन सिंह, राहुल अनंत, कुमार शानू आणि दुसऱ्या वर्षाचा एक विद्यार्थी करण जैन यांची चौकशी केल्यानंतर सीबीआयच्या पथकाने त्यांना अटक केली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एम्सचे वरिष्ठ प्राध्यापकांच्या उपस्थितीत त्या विद्यार्थ्यांना वसतीगृहातून ताब्यात घेण्यात आले. सीबीआयने वसतिगृहातील त्या विद्यार्थ्यांची रुमदेखील सील केली आहे.

याप्रकरणी एम्स पाटणाचे संस्थापक जीके पॉल यांनी सांगितले की, सीबीआय एम्सच्या चार विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले आहे. ते म्हणाले की, एका वरिष्ठ अधिकाऱ्याने त्यांना विद्यार्थ्यांचे फोटो आणि नंबर पाठवले होते. सीबीआयचे एक नवीन पथक डीन, वसतीगृह वार्डन आणि संचालकांचे ओएसडी यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना अटक केली आहे.

सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, दोन दिवसांपूर्वी सीबीआयने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी जमशेदपूरच्या 2017 च्या बॅचचे सिव्हिल इंजिनीअर पंकज कुमार उर्फ आदित्य याला मंगळवारी अटक केले होते. त्याच्यावर आरोप होता की, कुमारने हजारीबागमध्ये राष्ट्रीय परीक्षा एजन्सी(एनटीए)च्या ट्रंकमधून नीट-यूजीची प्रश्नपत्रिका चोरल्या होत्या. सीबीआयच्या माहीतीनुसार, बोकारो निवासी कुमार याला पटणा येथून अटक केली होती. सीबीआयने राजू सिंह नावाच्या व्यक्तीलाही अटक केली, ज्याने कथितपणे प्रश्नपत्रिका चोरण्यात कुमार याची मदत केली होती. सिंह याला हजारीबाग येथून अटक केली होती.