आजपासून माथेरान ते नेरळ थेट सेवेच्या चार फेऱ्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
matheran-new

सामना प्रतिनिधी । मुंबई

नेरळवरून थेट माथेरानला जाण्यासाठी आता थेट सेवेमध्ये वाढ करण्यात येऊन उद्या बुधवारपासून एकूण चार फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. या मार्गावर दररोज एक डाऊन आणि अप अशा दोन फेऱ्या चालवल्या जात होत्या. त्यात आणखी एका फेरीची भर पडली आहे. 30 नोव्हेंबरपासून दररोज अमन लॉज ते माथेरान सहाऐवजी आठ डब्यांच्या 16 शटल फेऱ्या चालविल्या जातील. त्यामुळे आठवडय़ाच्या फेऱ्या दीडशेच्या पुढे जातील. नेरळहून सकाळी 6.40 वा. सुटणारी फेरी बुधवारपासून स. 7.20 वा. सुरू होईल. ही गाडी माथेरानमध्ये 10.29 वा. पोहोचेल.

नवीन फेऱ्या

नेरळ-माथेरान
स. 8.50 वा., दु. 11.30 वा.
दु. 2.10 वा., सायं. 5 वा.
माथेरान-नेरळ
स. 9.20 वा., दु. 12 वा.
(6 डिसेंबरपासून सुरू)
दु. 2.45 वा., सायं. 5.30 वा. (5 डिसेंबर)
दु. 4.20 वा., सायं. 7 वा.
(5 डिसेंबर)