
सामना ऑनलाईन । यूट्रेक्ट
न्यूझीलंडनंतर नेदरलँडमध्ये दहशतवादी हल्ला झाला आहे. दहशतवाद्याने प्रवाशांनी भरलेल्या ट्राममध्ये अंदाधुंद गोळीबार केल्याने एकाचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहे. यूट्रेक्ट शहरामध्ये सोमवारी ही घटना घडली. यूट्रेक्ट शहरी पोलिसांनी अधिकृत ट्विटर हँडलवरून याची माहिती दिली आहे.
सोमवारी यूट्रेक्ट शहर गोळीबाराने हादरून गेले. प्रवाशांनी भरलेल्या ट्रामवर दहशतवाद्याने हल्ला करत अंदाधुंद गोळीबार केला. हल्लेखोराने आपला चेहरा कापडाने झाकलेला होता आणि ट्रामच्या रुळांवर उभे राहून त्याने गोळीबार केला. या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले आहेत. दहशतवादी हल्ल्यानंतर घटनास्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक पोलीस आणि बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेत जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे.
A shooting occurred on the #24oktoberplein in #Utrecht. The incident has been reported at 10.45 hour. Multiple people have been injured. The surrounding area has been cordoned off and we are investigating the matter.
— Politie Utrecht (@PolitieUtrecht) March 18, 2019
दरम्यान, या हल्ल्यानंतर नेदरलँडमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. हल्लेखोराच्या शोधासाठी तपास पथक तैनात करण्यात आले आहे. तसेच हेलिकॉप्टरच्या मदतीने हल्लेखोराचा शोध सुरू आहे.
याधी शुक्रवारी न्यूझीलंडमधील क्राईस्टचर्चमध्ये दोन मशिदीत दहशतवाद्याने तुफान गोळीबार केला. या हल्ल्यामध्ये पाच हिंदुस्थानी नागरिकांसह 50 लोकांचा मृत्यू झाला होता. अल नूर मशिद और लिनवूड एवेन्यू मशिदीवर एका ऑस्ट्रेलियन नागरिकाने हा हल्ला केला होता. पोलिसांनी या हल्लेखोराला अटक केली आहे.




























































