
सामना ऑनलाईन, नवी दिल्ली
नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी पोर्ट ब्लेअर इथे पहिल्यांदा तिरंगा फडकावल्याच्या घटनेला 75 वर्षे पूर्ण झाल्याचं औचित्य साधून, केंद्र सरकार 75 रुपयांचे नाणं चलनात आणणार आहे. अर्थ मंत्रालयाने या संदर्भात अधिसूचना जारी केली आहे.
अधिसूचनेनुसार, 75 रुपयांच्या या नाण्याचे वजन 35 ग्रॅम असेल. 50 टक्के चांदी, 40 टक्के तांबे आणि 5 टक्के झिंक आणि 5 टक्के जस्त धातूपासून हे नाणं बनवलं जाणार आहे.या नाण्यावर नेताजी सुभाषचंद्र बोस यांची प्रतिमा छापलेली असेल. सेल्युलर जेलच्या मागे तिरंग्याला सलामी देणाऱ्या सुभाषचंद्र बोस यांची प्रतिमा नाण्यावर मुद्रित केली जाणार आहे, असे अधिसूचनेत म्हटले आहे. त्यांच्या प्रतिमेखाली 75 अंक लिहिला आहे. यासोबतच नाण्याकर देवनागरी आणि इंग्रजीत ‘प्रथम ध्वजारोहण दिवस’ असे कोरलेले असेल. सुभाषचंद्र बोस यांनी पोर्ट ब्लेअरमध्ये 30 डिसेंबर 1943 रोजी पहिल्यांदा तिरंगा फडवाकला होता.




























































