प्राध्यापक साईबाबा यांची सेवा महाविद्यालयाकडून समाप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्ली विद्यापीठाच्या रामलाल आनंद महाविद्यालयाने सहायक प्राध्यापक जी. एन. साईबाबा यांची सेवा समाप्त केली आहे. सध्या ते नागपूर येथील तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत असून त्यांच्यावर माओवाद्यांशी संबंधाचा आरोप आहे. साईबाबा यांच्या पत्नी वसंता यांना गुरुवारी महाविद्यालयाचे पत्र मिळाले असून त्यात त्यांची सेवा 31 मार्चच्या दुपारपासून समाप्त करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य राकेश कुमार गुप्ता यांनी या पत्रात म्हटले आहे की, साईबाबा यांचे तीन महिन्यांचे वेतन त्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे. त्यांची सेवा समाप्त करण्यात आली असून आता यापुढे ते सेवेत नसतील. साईबाबा यांच्या सेवासमाप्तीबाबत प्राचार्य गुप्ता यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. साईबाबा हे इंग्रजीचे सहायक प्राध्यापक होते व त्यांना महाराष्ट्र पोलिसांनी 2014 मध्ये माओवाद्यांशी असलेल्या संबंधांवरून अटक केली होती. त्यांची पत्नी व मुली यांना ते अटकेत असतानाही त्यांच्या वेतनाचा निम्मा हिस्सा मिळत होता.