न्यू इंडिया सेंटरने स्पर्धा जिंकली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई 

न्यू इंडिया सेंटर संघाने जबरदस्त कामगिरी करीत स्थानीय लोकाधिकार समिती, न्यू इंडिया ऍश्युरन्सच्या वतीने आयोजित करण्यात आलेला कै. देवीदास खेडेकर स्मृती हिंदुहृदयसम्राट चषक पटकावला. या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा शिवसेना सचिव-खासदार अनिल देसाई, न्यू इंडिया ऍश्युरन्सचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक अतुल सहाय, महाव्यवस्थापक रणजीत गंगाधरन, उपमहाव्यवस्थापक राजेश, रामकुमार, डी. पी. सक्सेना,  मुख्य व्यवस्थापक अनिल जैन, एस. मोहंती, शिवसेना नगरसेविका किशोरी पेडणेकर, समाजसेवक बाळा खोपडे, युवासेना सहसचिव प्रथमेश बोभाटे यांच्या उपस्थितीत पार पाडला.

या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे, यावेळी न्यू इंडिया ऍश्युरन्स मॅनेजमेंट – स्थानीय लोकाधिकार समितीचे पदाधिकारी यांच्यात प्रदर्शनीय सामना खेळविण्यात आला. यामध्ये स्थानीय लोकाधिकार समितीचे सरचिटणीस दिनेश बोभाटे यांनी उत्कृष्ट अष्टपैलू खेळ खेळून आपल्या संघाला जिंकून दिले.

‘अ’ गटात अंतिम सामना न्यू इंडिया सेंटर – मुंबई प्रादेशिक कार्यालय 5 यांच्यात झाला. यामध्ये न्यू इंडिया सेंटर संघ अंतिम विजेता ठरला. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी समितीचे सरचिटणीस दिनेश बोभाटे, खजिनदार अजय गोयजी, चिटणीस बाबू परब, अजय पथरोड, मंगल कदम, राजू पांजरी, अनिल शेकोकर, सचिन लोके, ललित अत्तावर, विनोद नायकवाडी, आल्हाद नाईक, राजू राणे, अभय भोसले, सतीश खिरडकर, संजय सावंत, राजू चेट्टीयार, सतीश भगत, विलास परब, अशोक परब, संजय महाडिक यांनी परिश्रम घेतले.