
नव्या संसदेचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात यावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन करण्यास काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे.
सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाअंतर्गत 862 कोटी रुपये खर्चून नवी संसद उभारण्यात आली आहे. 18 मे रोजी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना उद्घाटन करण्यासाठी रीतसर निमंत्रण दिले. मात्र पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यास काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आक्षेप घेतला आहे. नव्या इमारतीचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली.
























































