
जर तुम्ही वाहन चालवताना तुम्हाला डुलकी लागली तर अपघात होण्याची शक्यता असते. मात्र, आता ड्रायव्हरला डुलकी लागण्याची शक्यता दिसताच ’अर्लट’ करणारी यंत्रणा तयार करण्यात येणार आहे.
देशात दरवर्षी रस्ते अपघातात एकूण 1.5 लाख लोकांचा मृत्यू होतो, तर 4.5 लाखांहून अधिक लोक जखमी होतात. अपघाताचे प्रमाण मोठे आहे. वाहन चालवताना झोपेची डुलकी लागली तर अपघातांना निमंत्रण मिळते. त्यामुळे वाहन चालवताना झोप येऊ लागताच ड्रायव्हरला सावधान करणारे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी राज्य परिवहन विभागाने पुढाकार घेतला आहे.



























































