इंजिनीयरिंग कॉलेजांमध्ये पुढील वर्षापासून अद्ययावत अभ्यासक्रम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जागतिक मागणी आणि गरजेनुसार इंजिनियर्स घडवता यावेत म्हणून त्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स, मशिन लर्निंग आदी अद्ययावत अभ्यासक्रम शिकवले पाहिजेत. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या (एआयसीटीई) अखत्यारित येणाऱ्या तंत्रशिक्षण महाविद्यालयांमध्ये 2021-22 या शैक्षणिक वर्षापासून असे अभ्यासक्रम सुरू होणार आहेत.

एआयसीटीईने या नव्या अभ्यासक्रमांची यादीच सर्व तंत्रशिक्षण संस्थांकडून मागवली आहे. मंजूरी देण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमांच्या यादीत त्यांचाही समावेश केला जाणार आहे. नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार हा निर्णय घेण्यात येत असला तरी त्याचा फायदा रोजगारक्षम विद्यार्थी घडवण्यासाठी होणार आहे. 2020-21 च्या शैक्षणिक वर्षातच अनेक संस्थांनी या नव्या अभ्यासक्रमांसाठी एआयसीटीईची मंजूरी मागितली होती.

गेल्या काही वर्षात इंजिनियरींगच्या पारंपारिक अभ्यासक्रमांच्या हजारो जागा रिक्त राहत आहेत. त्यामुळे एआयसीटीईने नव्या महाविद्यालयांना किमान दोन वर्षे तरी मंजूरी न देण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे देशातील इंजिनियरींगच्या शिक्षणात सुधारणा करण्याचाही एआयसीटीईचा उद्देश आहे. नवनवे अद्ययावत अभ्यासक्रम सुरू केले तर रिक्त राहणाऱया जागा त्या अभ्यासक्रमांसाठी वळवता येऊ शकणार आहेत.

नव्या अभ्यासक्रमांसाठी जागा वाढवून देणार
पुढील शैक्षणिक वर्षासाठी तंत्रशिक्षण संस्थांनी नव्या अभ्यासक्रमांसाठी अर्ज करावा. त्या अभ्यासक्रमांसाठी जागाही वाढवून दिल्या जातील असे एआयसीटीईने कळवले आहे. 15 नोक्हेंबरपर्यंत संस्थांना त्यांच्याकडे सुरू करण्यात येणाऱया नव्या अभ्यासक्रमांची माहिती एआयसीटीईला द्यावी लागणार आहे.