
हॅरी पॉटर ही जे.के. रोलिंग या ब्रिटिश लेखिकेने लिहिलेली सात कादंबऱयांची सिरीज आहे. यातील हॅरी पॉटर या पात्राने लहानथोरांकर केलेली जादू आजही कमी झालेली नाही. हॅरी पॉटर सिनेमांतून तर ती आणखीच काढली. पुन्हा एकदा ही जादू चाहत्यांना अनुभकता येणार आहे. न्यूयॉर्कच्या मॅनहॅटन शहरात हॅरी पॉटर थीमकर दोन मजली दुकान येत्या 3 जून रोज सुरू होणार असून हॅरी पॉटरकरील पुस्तके आणि सिनेमांचा खजिना चाहत्यांना खुला होणार आहे.
शॉपमध्ये हॅरी पॉटरच्या सिनेमातील दृश्य दाखवण्यात येतील. तसेच सिनेमांमध्ये वापरण्यात आलेल्या वस्तू, बघता येतील. 21 हजार चौरस फूट जागेवरील या शॉपमध्ये 15 वेगवेगळ्या थीम असतील. तिथे चाहत्यांना जादूची कांडी हातात घेता येईल. कोरोना महामारी आता संपतेय. जनजीवन पूर्ववत होईल. त्यामुळे दुकान उघडण्याची हीच केळ असून पर्यटकांना नक्कीच आमचा प्रयत्न आवडेल, असा विश्वास कॉर्नर ब्रदर्स रिटेल स्टोअरचे कार्ल डुरंट यांनी व्यक्त केला.
























































