
न्यूझीलंडमधील ऑकलंड सुपर मार्केटमध्ये शुक्रवारी एका हल्लेखोराने केलेल्या चाकूहल्ल्यामध्ये सहा जण जखमी झाले. पोलिसांनी हल्लेखोराला जागीच ठार केले. न्यूझीलंडचे पंतप्रधान जॅसिंडा आर्डर्न यांनी याला दहशतवादी हल्ला म्हटले आहे. हल्लेखोर आयएसआयएस या दहशतवादी संघटनेने प्रेरित असल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वी पोलीस अधिकाऱयांनी याला रेडम हल्ला म्हटले होते. त्यांनी दहशतवादी घटना म्हणून स्वीकारण्यास नकार दिला होता. ‘आज जे घडले ते द्वेषाने भरलेले आहे. असे होऊ नये. हल्लेखोराला श्रीलंकेचा नागरिक म्हणून वर्णन करताना तो 2011 मध्ये न्यूझीलंडला आला होता, असे सांगून पंतप्रधान आर्डर्न म्हणाल्या, ही घटना दुपारी 2.40 वाजता घडली. पोलीस अधिकाऱयांनी एका मिनिटात हल्लेखोराला ठार केले.
























































