नीक नॅचरल आइस्क्रीमने बाजारात आणले तीन नवे फ्लेवर, नावं ऐकून तोंडाला सुटेल पाणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नीक ऑनेस्टली नॅचरल आइस्क्रीम या आईस्क्रीम ब्रँडने तीन नवे फ्लेवर बाजारात आणले आहेत. लिमिटेड कलेक्शनमध्ये बेल्जिअन चॉकलेट, चिकू व फणस यांचा समावेश आहे. देशभर सर्व प्रमुख रिटेलरकडे व ऑनलाइन मिळणार असलेले हे नवे फ्लेवर 100% नैसर्गिक घटक आणि शुद्ध दूध यापासून बनवलेले आहेत तसेच त्यामध्ये कृत्रिम रंग किंवा प्रिझर्व्हेटिव्ह समाविष्ट नाहीत.

2015 मध्ये स्थापना झालेला नीक ऑनेस्टली नॅचरल आइस्क्रीम्स हा देशातील झपाट्याने वाढणारा ब्रँड आहे. “नीक ऑनेस्टली नॅचरल आइस्क्रीममध्ये आम्ही आईस्क्रीमप्रेमींना आनंद देण्यासाठी नवनवे पर्याय सतत शोधत असतो. या हंगामात नवे फ्लेवर आणताना आम्हाला अतिशय आनंद होतो आहे. या निमित्ताने, भारतभर विस्तार करण्याचे व डेझर्ट उत्पादनांमध्ये वैविध्य आणण्याचे आमचे उद्दिष्ट सादर करण्यासाठी आम्ही एक पाऊल टाकले आहे. आमच्या उत्पादनांमध्ये नवी भर टाकण्याची आमची बांधिलकी व पॅशन यातून दिसून येते. हे नवे फ्लेवर सर्व आईस्क्रीमप्रेमींना आवडतील, याची खात्री आहे”, असे वाल्को फूड कंपनी प्रा. लि.चे संचालक संजीव इंदर शहा यांनी सांगितले.

हे आईस्क्रीम 70 रुपयांमध्ये 100 मिली या दरामध्ये मिळेल आणि ते झोमॅटो व स्विगी सेवा देत असलेल्या सर्व शहरांत, तसेच सर्व दुकानांत आधीच उपलब्ध झालेले आहे.