अठरा हिंदुस्थानी असलेल्या हाँगकाँगच्या जहाजाचे समुद्री चाच्यांकडून अपहरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

नायजेरियाच्या किनाऱ्याजवळ समुद्री च्याच्यांनी हाँगकाँगच्या एका प्रवासी जहाजाचे अपहरण केले आहे.  या जहाजात 18 हिंदुस्थानी नागरिक आहेत. समुद्रातील हालचालींवर लक्ष ठेवणाऱ्या एआरएक्स मेरीटाईम संस्थेने ही माहिती आपल्या संकेतस्थळावर दिली आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यापासून हिंदुस्थानी दुतावासातील अधिकारी नायजेरिया सरकारच्या संपर्कात असून समुद्री चाच्यांच्या ताब्यातून  हिंदुस्थानी नागरिकांच्या सुटकेचे प्रयत्न करत आहेत. एआरएक्स मेरीटाईम संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी समुद्री चाच्यांनी  या जहाजावर हल्ला केला व हे जहाज ताब्यात घेतले. त्यानंतर या जहाजावरील 19 नागरिकांचे चाच्यांनी अपहरण केले. यातील 18 जण हिंदुस्थानी नागरिक आहेत तर एकजण तुर्कस्तानचा आहे. तीन डिसेंबरला संध्याकाळी नायजेरियाच्या समुद्रकिनाऱ्याजवळून जात असताना  समुद्री चाच्यांनी त्यावर हल्ला केला.2008 सालीही सोमालियाजवळ एडन खाडीतून जाणाऱ्या जहाजाला चाच्यांनी लक्ष्य केले होते. त्यावेळी जहाजावर 22 प्रवासी होते. त्यात 18 हिंदुस्थानी नागरिक होते.