जाहिरातीतले चेहरे चित्रपटात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जाहिरातींमधून घराघरांत पोहोचलेले दोन मराठी चेहेरे आता ‘इमेल फिमेल’ या मराठी चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. अभिनेता निखिल रत्नपारखी आणि कांचन पगारे ही जाहिरात क्षेत्रातील ही दोन परिचित नावं आता ‘इमेल फिमेल’ चित्रपटात आपली कमाल दाखवणार आहेत.

येत्या 26 फेबुवारी रोजी फेब्रुवारीला ‘इमेल फिमेल’ प्रदर्शित होणार आहे. यामध्ये निखिल आणि कांचन यांच्या परस्परविरोधी भूमिका असल्या तरी त्यांचा अतरंगीपणा, त्यातून निर्माण झालेला पेच याची मनोरंजक कथा  बघायला मिळेल.