
निलंगा येथील गायकवाड कुटुंबातील पाच जणांचा 11 एकर ऊस शॉर्टसर्कीटमुळे जळून गेला. या दुर्घटनेमुळे त्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
शॉर्टसर्कीट होऊन आग लागल्याने झटींगराव नरबाजी गायकवाड यांचा 2 एकर ऊस, बालाजी विश्वनाथ गायकवाड यांचा 2 एकर ऊस, गोविंद विश्वनाथ गायकवाड यांचा 2 एकर ऊस, अनिता अनंतराव गायकवाड यांचा 3 एकर ऊस, उमाकांत दत्तोबा गायकवाड यांचा 2 एकर ऊस असा 11 एकर ऊस जळाला. यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत होती.




























































