नीलेश कुलकर्णीच्या संस्थेला राष्ट्रीय खेळ प्रोत्साहन पुरस्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टीम इंडियाचे माजी कसोटीपटू नीलेश कुलकर्णी यांनी स्थापन केलेल्या आंतरराष्ट्रीय क्रीडा व्यवस्थापन संस्थेला युवा कार्य आणि क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते नुकतेच राष्ट्रीय खेळ प्रोत्साहन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. क्रीडा संवर्धन आणि विकासात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल संस्थेला हा पुरस्कार देण्यात आला आहे.

इंटरनॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ स्पोर्टस् मॅनेजमेंटच्या वतीने नीलेश कुलकर्णी यांनी केंद्राचा हा पुरस्कार स्वीकारला. याच संस्थेला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गेल्या वर्षी राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केला होता. इंटरनॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ स्पोर्टस् मॅनेजमेंट या क्रीडा व्यवस्थापन शिक्षणातील उपक्रम राबवणाऱया संस्थेची स्थापना नीलेश कुलकर्णी यांनी केली आहे. फिरकीवीर नीलेश कुलकर्णी टीम इंडियातर्फे 3 कसोटी आणि 10 एकदिवसीय क्रिकेट सामने खेळले आहेत.