नीलेश नवलाखा यांचे दिग्दर्शनात पदार्पण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘शाळा’, ‘अनुमती’ आणि ‘फँड्री’ या राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपटांची निर्मिती करणारे निर्माते नीलेश नवलाखा आता लेखन आणि दिग्दर्शनात पदार्पण करणार आहेत. ‘चाणक्य’ असे त्यांच्या आगामी चित्रपटाचे नाव असून चित्रपटाची निर्मितीदेखील  त्यांनीच केली आहे. या पॉलिटिकल थ्रीलर चित्रपटाचे धडाकेबाज पोस्टर दसऱयाच्या शुभ मुहूर्तावर लाँच करण्यात आले.

सभेसाठी जमलेल्या प्रचंड मोठय़ा जनसमुदायासमोर भाषण करणारा नेता आणि त्याच्या पाठीत खुपसलेला खंजीर असे दृश्य चित्रपटाच्या पोस्टरवर दिसत आहे. राजकारणातील थरारनाटय़ ‘चाणक्य’मधून उलगडणार आहे. पोस्टरमुळे चित्रपटाविषयीची उत्सुकता निर्माण झाली आहे. चित्रपटाविषयी नीलेश नवलाखा म्हणाले, ‘चाणक्य’ या चित्रपटातून अत्यंत टोकदार राजकीय कथा मांडली जाणार आहे. राजकारणाचा हा चरित्रपट असेल. या चित्रपटातील कलाकारांच्या नावाची घोषणा लवकरच करण्यात येईल.