निम्न दुधना प्रकल्पाचे दरवाजे उघडले, प्रकल्पाखालील गावांना सतर्कतेचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जालना जिल्ह्यातील परतुर येथील निम्न दुधना प्रकल्पाचे 14 दरवाजे 0.30 मीटरने उघडले असून प्रत्येक दरवाज्यातून 1020 क्यूसेस विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे. परतूर ,मंठा, जालना या तालुक्यात मागील 24 तासापासून जोरदार पाऊस पडला आहे. या मुळे निम्न दुधना प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाणी साठा जमा होत आहे.

या प्रकल्पात जवळपास 90 टक्के पाणी साठा जमा झाला आहे. या कारणाने आज दुपारी 2.30 ला धरणाचे दरवाजा क्रमांक 1,2,3,4,5,6,7,14,15,16,17,18,19,20 हे दरवाजे उघडण्यात आले आहे. परभणी जिल्ह्यातील दुधना काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देखील प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे. एकूण 14 दरवाज्यातून 14280 क्यूसेस पाण्याचा विसर्ग चालू असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे