अभिनेते नाना पाटेकर यांना मातृशोक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। मुंबई

अभिनेते नाना पाटेकर यांच्या आई निर्मला गजानन पाटेकर यांचे मंगळवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 99 वर्षांच्या होत्या. मुंबई येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्याच्या पश्चात पुत्र नाना, स्नुषा नीलकांती आणि नातू मल्हार असा परिवार आहे.