
मध्य रेल्वेच्या टिटवाळा लोकलच्या द्वितीय वर्गाच्या डब्यात ठाणे स्थानकादरम्यान अचानक आग लागल्याने गेल्या रविवारी खळबळ उडाली होती. ही लोकल सिमेन्स पंपनीची होती. आतापर्यंत अशा प्रकारच्या आगी भारत हेवी इलेक्ट्रिकल लि. अर्थात ‘भेल’ पंपनीच्या जुन्या लोकलना लागत होत्या. सध्या या ‘भेल’ पंपनीच्या जुन्या लोकल वापरातून काढून टाकल्या आहेत. परंतु आता सिमेन्स पंपनीच्या लोकलला आग लागल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे सीसीटीव्ही नसल्याने ही आग नेमकी कशी लागली हे समजू शकत नसल्याचे रेल्वेने म्हटले आहे.
ठाणे स्थानकात रविवार, 10 एप्रिल रोजी दुपारी 12.35 वाजण्याच्या सुमारास टिटवाळा लोकल आली असताना अचानक मोटरकोच असलेल्या (वर पेंटोग्राफ असलेल्या) डब्यातून धूर आणि ठिणग्या आल्याने प्रवाशी घाबरले. त्यानंतर अग्निशमन उपकरणाच्या मदतीने ही आग विझवण्यात आली. या आगीच्या घटनेनंतर या लोकलची तपासणी केली असताना ही आग बाह्यघटकामुळे लागली असावी असे प्राथमिक तपासाअंती निष्पन्न झाल्याचे रेल्वेच्या अधिकाऱयांनी म्हटले आहे. सिमेन्सच्या या लोकलमध्ये सीसीटीव्ही नसल्याने आता बाह्यघटकांमुळे आग कशी लागली याचा तपास करणे कठीण असल्याचे अधिकाऱयांनी म्हटले आहे. त्यामुळे पुन्हा अशी आग लागली तर प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण होईल असे म्हटले जात आहे.
एसी लोकलचा ब्रेक बायडिंग…
मध्य रेल्वेच्या घाटकोपर स्थानकादरम्यान ठाण्याहून निघालेल्या वातानुकूलित लोकलला ब्रेक बायडिंग झाल्याने लोकल सेवा विस्कळीत झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. या लोकलला ब्रेक बायडिंग झाल्याने तिच्या पाठोपाठ अनेक लोकल लटकल्या. दुपारी 2.50 वाजण्याच्या सुमारास वाहतूक सुरळीत करण्यात यश आले.






























































