स्विस बँकेतील हिंदुस्थानींच्या ३०० कोटींना कुणी वालीच नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन | झुरिच

हिंदुस्थानींचा काळा पैसा मोठ्या संख्येने स्विस बँकेत असल्याच्या बातम्या काही नवीन नाहीत. वर्षानुवर्षे स्वित्झरलँडच्या स्विस बँकेतील या काळ्या पैशांची व्याप्ती वाढतच गेली आहे. आता मात्र स्विस बँक प्रशासनाने एक वेगळाच गौप्यस्फोट केला आहे. तीन हिंदुस्थानी नागरिक आणि तीन हिंदुस्थानी वंशाच्या व्यक्तींची ६ खाती स्विस बँकेत आहेत. या खात्यांवर आतापर्यंत ३०० कोटी रुपयांची पुंजी जमा आहे. मात्र २०१५ पासून या रकमेवर हक्क सांगणारा खातेदार अद्याप बँकेकडे आलेला नाही. ही खाती कुणाची आहेत त्याचा शोध बँक प्रशासन घेत आहे.

स्विस बँकेने आता हिंदुस्थान सरकारसोबत त्यांच्या खात्यांबद्दल माहिती शेअर करण्याचा करार केला आहे. हिंदुस्थानने आर्थिक गैरव्यवहार आणि करचुकवेगिरीचे पुरावे दिल्यास संशयित बँक खात्यांची माहिती स्विस बँक देणार आहे. या परिस्थितीत हिंदुस्थानची या बँकेतील सहा खाती बेवारस म्हणून पडली आहेत. या खात्यांमध्ये आतापर्यंत एकूण ३०० कोटी रुपये जमा झालेले आहेत. या बेवारस खात्यातील रकमेवर हक्क सांगणाऱ्यांनी आपले अधिकृत पुरावे बँकेकडे सादर करून या खात्यांचा ताबा घ्यावा असे आवाहन स्विस बँक प्रशासनाने केले आहे. स्विस बँकेत अशी बेवारस ३५०० खाती आहेत. त्यातील ६ खाती हिंदुस्थानींची असल्याचे स्विस बँकेने उघड केले आहे.