
सामना ऑनलाईन, मुंबई
वसई, विरार, नालासोपारा, पालघर या भागात पडलेल्या मुसळधार पावसामुळे या भागातील रेल्वेसेवेवर त्याचा परिणाम झाला होता. मंगळवारी वसई आणि विरारदरम्यानची दोन्ही दिशेची वाहतूक बंद होती. बुधवारी देखील रुळावरील पाणी न ओसरल्याने विरार भाईंदरदरम्यानची वाहतूक सुरू होऊ शकलेली नाही. चर्चगेट ते भाईंदरदरम्यानची वाहतूक सुरळितपणे सुरू असल्याचं पश्चिम रेल्वेने सांगितले आहे. वसई आणि विरारदरम्यानची वाहतूक केव्हा सुरू होईल हे आत्ता सांगणं कठीण आहे. या पट्ट्यामध्ये रेल्वे रूळ अजूनही पाण्याखाली असल्याने त्यावरून लोकल किंवा लांब पल्ल्याच्या गाड्या चालवणं हे अत्यंत धोकादायक ठरू शकतं, यामुळेच इथली वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.


























































