महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण? 2018 पुरस्कार सोहळ्याची नामांकने जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

झी एंटरटेनमेंट एन्टरप्रायजेस लिमिटेडची एकमेव मराठी चित्रपट वाहिनी झी टॉकीज प्रस्तुत सर्वांच्या लाडक्या आणि प्रेक्षक ज्याची आतुरतेने वाट पाहतात अशा महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण 2018 या पुरस्कार सोहळ्याचे नामांकन घोषित करण्यात आले आहे. झी टॉकीज प्रस्तुत महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण हे मराठी सिनेसृष्टीतील एकमेव व्युव्हर्स चॉईस अवॉर्ड्स आहेत. महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण हे पुरस्कार नवव्या वर्षात पदार्पण करत असून, या पुरस्कारांनी नेहमीच नवोदित कलाकार आणि त्याच्या टॅलेंटला वाव दिली आहे. महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण या पुरस्कारांसाठी 12 विभागात नामांकन जाहीर झालं असून, ‘फेव्हरेट चित्रपट’, ‘फेव्हरेट अभिनेता’, ‘फेव्हरेट अभिनेत्री’, ‘फेव्हरेट स्टाईल आयकॉन’, ‘फेव्हरेट पॉप्युलर फेस ऑफ द इयर’, ‘फेव्हरेट गीत’ या प्रसिद्ध विभागात कमालीची टक्कर असणार आहे. मराठी चित्रपट चाहते आजपासून या अद्भुत पुरस्कार सोहळ्यात आपल्या लाडक्या कलाकारांना पुरस्कृत करण्यासाठी आपले मत 25 जानेवारी पर्यंत नोंदवू शकतात. ‘फेव्हरेट चित्रपट’ या विभागात वेगवेगळ्या शैलीचे तसेच समीक्षकांकडून कौतुकाची थाप मिळालेल्या चित्रपटांचा समावेश आहे. या पुरस्कारासाठी येरे येरे पैसा, बॉईज 2, फर्जंद, नाळ, मुळशी पॅटर्न आणि बबन या चित्रपटांमध्ये चुरशीचा सामना रंगणार आहे.

2018 मध्ये आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनात घर केलेल्या कलारांचा फेव्हरेट अभिनेता आणि फेव्हरेट अभिनेत्री या विभागात समावेश करण्यात आला आहे. पुष्पक विमान या चित्रपटातील अप्रतिम अभिनयासाठी सुबोध भावे याने फेव्हरेट अभिनेता या विभागात नामांकन पटकावलं आहे. त्याचबरोबर मुळशी पॅटर्न चित्रपटातील कमाल अभिनयासाठी ओम भुतकर, नाळ मधील सहज सादरीकरणासाठी श्रीनिवास पोकळे, बबन मधील उत्कृष्ट कामगिरीसाठी भाऊसाहेब शिंदे आणि बॉईज 2 चित्रपटात प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करण्यासाठी पार्थ भालेराव यांनी विभागात नामांकनं पटकावली आहेत. फेव्हरेट अभिनेत्री या विभागात धकधक गर्ल माधुरी दीक्षित हिने बकेट लिस्ट मधील सादर केलेली उत्तम भूमिका नामांकनं पटकावून गेलीय, तसेच सोनाली कुलकर्णी हिच्या गुलाबजाम मधील प्रेरक कलाकृती, तेजस्विनी पंडित हिची येरे येरे पैसा मधील अफलातून कामगिरी, कल्याणी मुळे हिचा न्यूड मधील उत्कृष्ट अभिनय, फर्जंदमधील मृण्मयीने सादर केलेली अप्रतिम भूमिका आणि नाळ मधील गोड देविका दफ्तारदार यांनी देखील या विभागात नामांकनं पटकावली आहे.

फेव्हरेट गीत या विभागात येरे येरे पैसा मधील खंडाळा घाट आणि टायटल ट्रॅक, बॉईज 2 चित्रपटातील गोटी सोडा, मुळशी पॅटर्न या चित्रपाटातील अरारारा, रेडू मधील देवाक काळजी रे, तसेच नाळ चित्रपटातील जाऊ दे न व या गाण्याचा समावेश आहे. तरुणींच्या काळजाचा ठाव घेणारे मराठी सिनेसृष्टीतील अभिनेते अंकुश चौधरी, अमेय वाघ, ललित प्रभाकर, सिद्धार्थ चांदेकर, उमेश कामत आणि स्वप्नील जोशी यांनी महाराष्ट्राचा फेव्हरेट स्टाईल आयकॉन या विभागात नामांकन पटकावलं आहे. तसेच सिनेसृष्टीतील स्वप्नसुंदरी अभिनेत्री सई ताम्हणकर, मिथिला पालकर, मृणाल ठाकूर, वैदेही परशुरामी, सोनाली कुलकर्णी आणि मृण्मयी देशपांडे यांनी फेव्हरेट पॉप्युलर फेस ऑफ द इयर या विभागात नामांकन पटकावले आहे.

महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण 2018 हे पुरस्कार सर्व नवोदित कलाकार तसेच पडद्यामागील कलाकारांना पुरस्कृत करतील. चमकदार पुरस्कार सोहळ्याची संध्याकाळ, ग्लॅमर्स सिनेतारकांचे अफलातूनपरफॉर्मन्स आणि विनोदवीरांची मैफिल या सर्व गोष्टी प्रेक्षक अनुभवातील महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण २०१८ मध्ये. प्रेक्षक नक्कीच या पुरस्कार सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत आहेत यात शंकाच नाही.