सरकारला धक्का,‘जीएसटी’चे उत्पन्न घटले!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) संकलनात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याच्या तुलनेत डिसेंबर महिन्यात मोठी घट झाल्याने सरकारला धक्का बसला आहे. अर्थमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार डिसेंबर 2018 मध्ये जीएसटी संकलन 94,726 कोटी रुपये झाले आहे. नोव्हेंबर महिन्यात 97,637 कोटी रुपये जीएसटी संकलन झाले होते. त्यापूर्वी ऑक्टोबर महिन्यात सरकारने 1.07 लाख कोटी जीएसटी संकलन केले होते.

अर्थमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार 30 डिसेंबर 2018 पर्यंत एकूण 72.44 लाख सेल्स रिटर्न (जीएसटीआर-3बी) भरण्यात आले होते. ऑगस्ट-सप्टेंबरदरम्यान राज्य सरकारला 11,922 कोटींची भरपाई देण्यात आली.डिसेंबरमध्ये संकलित केलेल्या 94,726 कोटी रुपये जीएसटीमध्ये केंद्रीय जीएसटी संकलन 16,442 कोटींचे तर राज्याचे जीएसटी संकलन 22,459 कोटी रुपयांचे आहे. एकात्मिक (इंटेगेटेड) जीएसटी संकलन 46,936 कोटी रुपयांचे झाले आहे. तसेच जीएसटी सेस 7,888 कोटी रुपये इतका संकलित झाला आहे.

असे आहे एप्रिल 2018 पासूनचे जीएसटी संकलन

  • एप्रिल -1.03 लाख कोटी
  • मे-94,016 कोटी
  • जून-95,610 कोटी
  • जुलै-96,483 कोटी
  • ऑगस्ट-93,960 कोटी
  • सप्टेंबर-94,442 कोटी
  • ऑक्टोबर-1.710लाख कोटी
  • नोव्हेंबर-97,637 कोटी
  • डिसेंबर-94,726 कोटी