आता फोन नंबर लपवून करा चॅटिंग; व्हॉट्सअॅप आणणार नवे फीचर

ठरावीक काळानंतर व्हॉट्सअॅपवर नवनवीन फीचर येत असतात. आताही नवे फीचर सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. डब्ल्यूए बीटा इन्पह्च्या माहितीनुसार, व्हॉट्सअॅप एका नवीन फीचरवर काम करत आहे, ज्यामुळे लोकांना त्यांचा फोन नंबर न सांगता चॅट करता येईल. त्यामुळे नंबर शेअर करण्याची समस्या दूर होणार आहे. या फीचरची चाचणी सुरू आहे.

अहवालानुसार, व्हॉट्सअॅप युजर्स लवकरच या फीचरचा वापर करू शकतील. या फीचरचा वापर करून युजर्स एक युनिक असे युजरनेम तयार करू शकतील. यामुळे युजर्सला प्रोफाइलबाबत अधिक गोपनीयता बाळगता येईल. तसेच युजर्सना त्यांचा फोन नंबरदेखील लपवता येणार आहे आणि फोन नंबर न दाखवतादेखील युजर्सना चॅट करता येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे युजर्स युनिक युजरनेमच्या मदतीने इतरांनाही सर्च करू शकतील. अँड्रॉइड आणि वेब युजर्सना लवकरच या फीचरचा वापर करता येऊ शकतो असे समजते. दरम्यान व्हॉट्सअॅपच्या वेब व्हर्जनमध्ये साइडबारच्या लेआऊटमध्येही बदल होणार असल्याच्या चर्चा सध्या आहेत.