
‘व्हॉट्सअॅप’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नवनवीन फीचर्स काही काळाने लॉन्च होत असतात. आतासुद्धा व्हॉट्सअॅपने आयओएस आणि अँड्रॉईडच्या लेटेस्ट बीटा व्हर्जनवर ‘व्हिडीओ मेसेज’ या फीचरचे टेस्टिंग सुरू केले आहे. यामुळे व्हॉइस मेसेजसप्रमाणे युसर्जला फिचर व्हिडीओ रेकॉर्ड करणे आणि पाठवणे शक्य होणार आहे. या फीचरमुळे चॅट करत असताना एका क्लीकवर व्हिडीओ रेकॉर्ड करून पाठवू शकता. अगदी लहान व्हिडीओदेखील रेकॉर्ड करता येणार आहेत.
व्हॉट्सअॅप फीचरच्या अपडेटवर लक्ष ठेवणाऱ्या ‘डब्ल्यूएबीटाइन्पह्’ला हे फीचर दिसले आहे. स्क्रीनच्या खालील बाजूस असलेल्या चॅट बारवर अटॅचमेंट बटणाच्या बाजूला हे फीचर आहे.






























































