लातूर येथून पळवलेल्या मुलीवर पुणे येथे बलात्कार: चौघांवर गुन्हा दाखल केला

19

सामना प्रतिनिधी । लातूर

टेलरींगचे प्रशिक्षण घेण्यासाठी निलंगा तालुक्यातील अंबुलगा विश्वनाथ येथून लातूरात आलेल्या पिडीत मुलीस गावातील चौघांनी लातूर येथून पळवून पुण्यास नेले.एकाने तिच्या इच्छेविरुध्द तीन वेळा बलात्कार केल्याच्या फिर्यादीवरुन लातूर येथील शिवाजी नगर पोलीस ठाण्यात बलात्कार करणार व त्याला मदत करणारे असे चौघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निलंगा तालूक्यातील मौजे अंबुलगा विश्वनाथ येथील इयत्ता १२ वी परीक्षा दिलेली पिडीत मुलगी ही लातूर येथे एक महिण्याच्या टेलरींगच्या प्रशिक्षणसाठी आलेली होती. ९ एप्रील २०१९ रोजी जिल्हा परिषदेच्या मेन गेटच्या बाहेर सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास एका कारमध्ये तिच्या गावातील लखन शिंदे दिसला. त्याने आवाज देवून पिडीत मुलीस बोलावून घेतले व हात धरुन कारमध्ये बसवले. त्यावेळी कारमध्ये विक्रम शिंदे हा कार चालतव होता. त्यांच्या सोबत डिगंबर शिंदे, दत्ता शिंदे हे होते. रात्रभर प्रवास करुन ते सर्व जण पुणे येथील सुधीर केंद्रे याच्या घरी गेले. तिथून एका पत्र्याच्या खोलीत तिला डांबून ठेवले. तेथे लखन शिवाजी शिंदे याने पिडीतेच्या इच्छेविरुध्द तीन वेळा जबरदस्तीने बलात्कार केला. कोणी नसल्याचे पाहून तिने तिथून पळ काढला. मात्र आपली अब्रु जाईल म्हणून त्यावेळी तिने फिर्याद दाखल केली नाही.

त्यानंतर या प्रकरणी 13 मे 2019 रोजी पोलिसांनी लखन शिवाजी शिंदे, विक्रम शिंदे, डिगांबर शिंदे, दत्ता शिंदे या चौघांविरुध्द भादवी कलम ३७६(२) ३६६,३४३,५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला.

आपली प्रतिक्रिया द्या