पुण्यात भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जेष्ठाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना 10 जून रोजी पुण्याच्या पाषाण रस्त्यावर घडली. याप्रकरणी मोटार चालक महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल जोशी (वय 73, रा. बाणेर रस्ता, बालेवाडी) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. मुलगा योगेश जोशी (वय 42) यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात याबद्दल फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पल्लवी गुप्ता (रा. बावधन) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुचाकीस्वार अनिल जोशी 10 जूनला संध्याकाळी चारच्या सुमारास पाषाण रस्त्यावरुन जात होते. त्यावेळी एचईएमआरएल कंपनीसमोर भरधाव मोटारीने त्यांना धडक दिली. त्यामुळे ते गंभीररित्या जखमी झाले. यावेळी त्यांना तत्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक संतोष कोळी तपास करत आहेत.