
संगमेश्वर तालुक्यातील येगाव बौद्धवाडी येथील एक वृद्ध महिलांवर अश्लील शेरेबाजी करत होता. अनेकवेळा समज देऊनही त्याच्या वर्तनात सुधारणा होत नव्हती. त्याची महिलांवर अश्लील शेरबाजी सुरुच होती. या वृद्धाच्या या वागण्याचा राग आल्याने विनोद चंद्रकांत कदम याने घरात घुसून वृद्धाच्या डोक्यावर काठीने जोरदार प्रहार केला.त्यात जखमी झालेल्या वृद्धाचा मृत्यू झाला. नथुराम भागूराम जाधव ( वय 67) असे मृत वृद्धाचे नाव आहे.
याबाबतची तक्रार वृद्धाची पत्नी नमिता नथुराम जाधव (वय 55) यांनी सावर्डे पोलीस ठाण्यात दाखल केली. याप्रकरणी विनोद चंद्रकांत कदम याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी सावर्डे पोलीस अधिक तपास करत आहेत.





























































