वसईत कबुतर चोरल्याच्या संशयावरून वृद्धाची हत्या

45

सामना प्रतिनिधी । वसई

कबुतर चोरल्याच्या संशयावरून वसईत 70 वर्षीय इसमाची हत्या करण्यात आली आहे. वसईच्या रानगाव परिसरातील लव पाड्यात काल शुक्रवारी 8 वाजता ही घटना घडली. याबाबत वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणात 8 जणांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

70 वर्षाचे रामचंद्र राऊत, वसई रानगाव परिसरातील लवपाडा येथे ते आपल्या कुटुबींयांसोबत राहत होते. कबुतर चोरल्याच्या संशयावरून,  रात्री 8 च्या सुमारास 8 ते 10 जणांच्या घोळका त्यांना जाब विचारण्यासाठी आला होता. या विचारण्यावरून त्यांच्यात वादविवाद झाला  आणि याच विवादातून या जमावाने वृद्धाची गळा दाबून हत्या करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.  वसई पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून 8 जणांना अटक करण्यात आली आहे. मागच्या एक वर्षांपासून काबूतरावरून यांच्यात वादही सुरू होता आणि रात्री याच वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन एका 70 वर्षाच्या वयोवृद्ध ला आपला जीव गमवावा लागला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या