साडी नेसून आजीबाईंनी केली बॉलिंग स्ट्राईक, रितेश देशमुखने ‘बॉस लेडी’ म्हणत केले काैतुक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इंटरनेटवर सध्या एका आजीबाईंचा व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला आहे. यात पिवळ्या रंगाची साडी नेसून आणि चेहऱयावर मास्क लावून एक आजीबाई बॉलिंग स्ट्राईक खेळताना दिसतायत. या खेळाचा फारसा अनुभव नसतानाही आजीबाईंनी एकाच झटक्यात सगळे स्ट्राईक शूट केले आहेत. आपल्या आजीच्या खेळाचे काैतुक करण्यासाठी सुदर्शन कृष्णमूर्ती या ट्विटर युजरने हा व्हिडिओ पोस्ट केला होता. बघताबघता या व्हिडिओला चार मिलियनच्या आसपास ह्यूज मिळाले आहेत. आजीबाईंच्या या स्वॅगचा अभिनेता रितेश देशमुखदेखील दिवाना झाला आहे. ‘बॉस लेडी’ म्हणत त्याने हा व्हिडिओ रिट्विट केला आहे.