शालेय विद्यार्थ्यांसाठी देशातील सर्वात मोठे सामान्यज्ञानाचे ऑनलाईन ऑलिम्पियाड

olympiad 2020 mind wars

सामान्यज्ञान हा जीवनाचा महत्त्वाचा घटक आहे. ऑलिम्पियाडसारख्या स्पर्धांमधून सामान्यज्ञान वाढते. विद्यार्थी आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांसंदर्भात जागरुक राहतात आणि त्यायोगे त्यांची निर्णयक्षमता वाढवते. आत्मविश्वासही वाढीस लागतो.

मुलांनी आयुष्यात काही निश्चित स्थान, नावलौकिक कमवावा अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते. म्हणूनच या इच्छेला पाठबळ देण्यासाठी ‘माईंड वॉर्स’ने देशातील सर्वात मोठे सामान्यज्ञानाचे ऑनलाईन ऑलिम्पियाड 2020 जाहीर केले आहे. हे झी एन्टरटेनमेंट एन्टरप्राइझेस लिमिटेडद्वारा पुरस्कृत ऑलिम्पियाड योग्य विद्यार्थ्यांची निवड करून, त्यांना प्रोत्साहित करून पुढे नेण्यासाठी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्याच्या उद्देशाने जाहीर केलेले आहे.

राष्ट्रीय स्तरावरील ही स्पर्धा नोव्हेंबर 2020 मध्ये सुरू होत आहे. ही स्पर्धा देशभरातील सर्व शिक्षण मंडळातील इयत्ता 4 थी ते 12 वीतील विद्यार्थ्यांसाठी खुली आहे. 20 मिनिटांच्या या परीक्षेत प्रत्येक इयत्तेसाठीच्या पाच विषयांवरील सुसंगत आणि रंजक प्रश्नांचा समावेश असेल. हे प्रश्न सर्वसाधारण माहितीवर आधारित असतील. येत्या काही वर्षांत विद्यार्थ्यांची वाढ आणि विकास होण्याचा उद्देश या परीक्षेमागे आहे. शिवाय, देशभरातील 5000 शाळांमधील मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्याशी तपशीलवार केलेल्या चर्चेनुसारच या परीक्षेची आखणी केलेली आहे.

विद्यार्थ्यांना या परीक्षेचा ऑनलाईन सराव करण्याची सुविधा अखंडितपणे (24*7) उपलब्ध करून दिली आहे. या परीक्षेमुळे त्यांना राष्ट्रीय विजेता म्हणून ओळख मिळेल आणि 1 कोटी रुपयांचा पुरस्कार मिळवण्याची संधी आहे.

ऑलिम्पियाडमध्ये भाग घेण्यासाठी कृपया भेट द्या – https://www.mindwars.co.in/olympiad/

परीक्षेच्या तारखा-

22, 22 आणि 29 नोव्हेंबर 2020

5, 6, आणि 12 डिसेंबर 2020

आपली प्रतिक्रिया द्या