ओंकार-आरतीचा प्रेमिकल लोचा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेता ओंकार गोवर्धन आणि अभिनेत्री आरती मोरे यांची ‘प्रेमिकल लोचा’ ही ऑडिओ मालिका स्टोरीटेलवर प्रदर्शित होणार आहे. लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये गुपचूप राहणाऱ्या जोडप्याची ही धम्माल गोष्ट आहे. ही गोष्ट मनस्विनी लता रवींद्र यांनी लिहिली आहे आणि त्याला आवाज दिला आहे अभिनेता ओंकार गोवर्धन आणि अभिनेत्री आरती मोरे यांनी. ओंकारला आपण सध्या महाराष्ट्रातील घराघरांत लोकप्रिय असलेल्या ‘आई कुठे काय करते’मध्ये पाहत आहोत. तसेच त्याला शाहिद कपूर, प्रियांका चोप्राच्या ‘कमिने’मध्ये पाहिले आहे, तर अभिनेत्री आरती मोरेचा अभिनय ‘झिंक चिक झिंक’ या चित्रपटात बालकलाकार म्हणून तर ‘करार’, ‘बाबांची शाळा’, ‘चिं.सौ.कां.’, ‘उबुंटू’ आदी चित्रपटांमध्ये पाहिला आहे. सळसळत्या तरुणीची धम्माल उडवणारी खुमासदार कथा ऐकण्यासाठी ‘स्टोरीटेल’ने 14 फेब्रुवारीचा मुहूर्त निवडला आहे.