
छोटय़ा पडद्यावरील अभिनेत्रीला सोशल मीडियावर जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. धमकीप्रकरणी अभिनेत्रीने ओशिवरा पोलीस ठाण्यात धाव घेतली. ओशिवरा पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
अभिनेत्रीने नुकतेच सोशल मीडियावर एक रील अपलोड केले होते. त्या रिलच्या खाली एक कमेंट होती. लवकरच तुझी हत्या केली जाणार असल्याचे त्यात नमूद होते. त्यानंतर अभिनेत्रीने ओशिवरा पोलीस ठाण्यात धाव घेतली. अभिनेत्रीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. या गुह्यात आतापर्यंत कोणालाही अटक केलेली नाही.
























































