गावठी कट्टा बाळगणाऱ्या सराईताला अटक, खंडणी व अमली पदार्थ विरोधी पथकाची कामगिरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गावठी कट्टा बाळगणाऱ्या सराईताला खंडणी व अमली पदार्थ विरोधी पथकाने नाना पेठेतून अटक केले. त्याच्याकडून गावठी कट्टा आणि काडतुसे असा 20 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला. मुनाफ रियाज पठाण (वय – 23, रा. नानापेठ) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाना पेठेतील एका मंदीरामागे सराईत थांबला असून त्याच्याकडे गावठी कट्टा आणि काडतुसे असल्याची माहिती पोलीस नाईक साहिल शेख यांना मिळाली. त्यानुसार खंडणी व अमली  पदार्थ विरोधी पथकाने परिसरात सापळा रचला. त्यावेळी तेथे उभा असलेला मुनाफ कमरेला हात लावत असल्याचे दिसून आले. त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

अंगझडतीत त्याच्याकडे गावठी कट्टा आणि काडतुसे मिळून 20 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला. ही कामरिगी पोलीस उपायुक्त संभाजी कदम, पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते, पोलीस उपनिरीक्षक दत्ताजीराव मोहिते, उदय काळभोर, साहिल शेख, प्रमोद टिळेकर यांच्या पथकाने केली.