
श्रीरामपूर शहरातील बिफ मार्केट परिसरात पोलिसांनी छापा टाकून 1 लाख 65 हजार रुपये किंमतीचे गोमास जप्त केले. या प्रकरणी दाऊद अजीज कुरेशी याला पोलिसांनी अटक केली आहे. मुळचा मुंबईचा रहिवासी असलेल्या दाऊद कुरेशी हा तात्पुरता शहरात फतिमा हाऊसिंग सोसायटीमध्ये राहतो. जिथे गोमांस मिळेल त्या ठिकाणी भाड्याने खोली घेऊन राहतो.
बिफ मार्केट परिसरात कुरेशी हा गोवंश जनावरांचे मांस विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकून एक लाख 65 हजार रुपये किंमतीचे गोमांस तसेच टाटा कंपनीची कार जप्त केली आहे. पोलिस शिपाई अमोल गायकवाड यांच्या तक्रारीवरून दाऊद कुरेशी याच्याविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस नाईक बैसाणे करीत आहे.





























































