अवकाळी पावसाचा सर्वत्रच फटका बसल्याने शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले असताना शिरूर तालुक्यातील तांदळी येथील शेतकरी मुक्ताजी रघुनाथ गदादे यांनी जीवापाड सांभाळलेल्या कांद्याला चांगलाच भाव मिळाला आहे. सोलापूर कृषी बाजार समितीत त्यांनी विक्रीसाठी नेलेल्या चांगल्या प्रतीच्या जेमतेम 23 गोण्या कांद्याला खर्च वजा जाता चक्क एक लाख रुपये मिळालेत. अडचणीच्या काळात कांद्याला मिळालेल्या चांगल्या बाजारभावामुळे कुटुंबास बऱ्यापैकी आर्थिक हातभार मिळाल्याचे गदादे यांनी सांगितले.

गदादे यांनी सोलापूर मार्केटला नेलेल्या मात्र २३ गोण्यातील चांगल्या प्रतीच्या कांद्याला 110 रुपये प्रतिकिलो असा उचांकी भाव मिळाला. एकूण 1232 किलो कांद्याला सरासरी 83 रुपये 33 पैसे भाव मिळाला. त्यामुळे मुक्ताजी गदादे यांना जेमतेम 23 गोण्या कांद्याला खर्च वजा जाता चक्क एक लाख रुपये मिळालेत. कांदा जीवापाड संभाळल्याचे आत्यंतिक समाधान झाल्याचे त्यांनी सांगितले. आज शेतकरी ही कांद्याला मिळालेला भाव पाहून आचंबित होत असल्याची प्रतिक्रिया प्रगतशील शेतकरी मुक्ताजी आबा गदादे यांनी व्यक्त केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या