विरोधकांच्या तोंडी पाकिस्तानची भाषा, पंतप्रधान मोदींची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आज राज्यसभेत नागरिकत्व सुधारणा कायदा सादर करण्यात आला आहे. त्यापूर्वी बुधवारी भाजपची संसदीय दलाची बैठक पार पडली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप खासदारांना संबोधित केले आणि विरोधी पक्षांवर जोरदार टीका केली. विरोधी पक्षांच्या तोंडी पाकिस्तानची भाषा आहे. जसे पाकिसातन बोलत आहे तसेच विरोधी पक्ष बोलत आहेत असे मोदी म्हणाले. तसेच या कायद्याबद्दल लोकांना माहिती द्या असे आवाहन त्यांनी उपस्थित खासदारांना केले.

आज तकने या बाबत वृत्त दिले आहे. मोदी अपाल्या भाषणात म्हणाले की, “अनेक मुद्द्यांवर विरोधी पक्ष पाकिस्तानची भाषा बोलत आहेत. त्यात अगदी पुर्णाविराम आणि सल्पविरामही तशाच्या तसा असतो.” या कायद्याबद्दल सामान्य जनतेला माहित असले पाहिजे. त्यांना यांचे फायदे कळाले पाहिजे. तसेच या कायद्याबद्दल ज्या अफवा पसरवल्या जात आहेत त्या दूर केल्या पाहिजे असेही मोदी यावेळी म्हणाले.

https://www.saamana.com/winter-session-of-parliament-2019-live/