
शेतकऱ्यांचा अवमान करणाऱया कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आणि भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी करत आज कृषिदिनी विरोधकांनी विधानसभा डोक्यावर घेतली. माफी मागा माफी मागा, शेतकऱ्यांची माफी मागा… ह्या सरकारचे करायचे काय, खाली डोकं वर पाय… शेतकरीविरोधी सरकारचा धिक्कार असो… अशा जोरदार घोषणा दिल्या. त्यामुळे प्रचंड गदारोळ झाल्याने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहाचे कामकाज तहकूब केले. कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतरही गदारोळ कायम राहिल्याने आणि आक्रमक झालेल्या कॉंग्रेस आमदार नाना पटोले यांना निलंबित केले गेल्याने विरोधकांनी कामकाजावरच बहिष्कार घातला.
प्रश्नोत्तराच्या तासानंतर कॉंग्रेस आमदार नाना पटोले यांनी हा मुद्दा उपस्थित केला. कृषिमंत्री कोकाटे आणि आमदार लोणीकर यांच्याकडून शेतकऱयांबद्दल वादग्रस्त वक्तव्ये केली जात आहेत. शेतकऱयांना पेरणीसाठी सहा हजार रुपये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले. लाडकी बहीण योजनेतील पैसेदेखील मोदींमुळेच मिळत आहेत. तुझ्या मायचा पगार आणि बापाची पेन्शन भाजपनेच दिली आहे, असे आक्षेपार्ह वक्तव्य लोणीकर यांनी केले होते. त्याची आठवण करून देत नाना पटोले यांनी कारवाईची मागणी केली. मोदी तुमचा बाप असेल, शेतकऱयांचा नाही असा संतापही त्यांनी व्यक्त केला. विरोधी पक्षातील अन्य सदस्यांनीही पटोले यांची मागणी लावून धरली.
अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पटोले यांना सभागृहात असंसदीय भाषा वापरू नका असे सांगितले. दरम्यान, शेतकऱयांचा अवमान करणाऱया कोकाटे, लोणीकर आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या सरकारविरोधात विरोधी सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. पटोले यांनी थेट अध्यक्षांच्या आसनासमोर जाऊन कारवाईचा हट्ट धरला. त्यामुळे अध्यक्ष नार्वेकर यांनी सभागृहाचे कामकाज पाच मिनिटांसाठी तहकूब केले.
कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतरही विरोधक आक्रमक झाले. नाना पटोले यांनी अध्यक्षांच्या आसनासमोर जाऊन जाब विचारला. पटोले यांना जागेवर जाऊन बसण्याच्या सूचना दिल्यानंतरही ते तिथून हलले नाहीत. शेतकऱयांचा अवमान करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश द्या असा आग्रह त्यांनी धरला. त्यावेळी त्यांचा हात अध्यक्षांसमोरील राजदंडाला लागला. त्यामुळे अध्यक्षांनी त्यांना सभागृहातून एक दिवसासाठी निलंबित केले. या हुकूमशाहीचा निषेध नोंदवत विरोधी आमदारांनी सरकारविरुध्द जोरदार घोषणा दिल्या.
जोरदार घोषणाबाजी सुरू केली. पटोले यांनी थेट अध्यक्षांच्या आसनासमोर जाऊन कारवाईचा हट्ट धरला. त्यामुळे अध्यक्ष नार्वेकर यांनी सभागृहाचे कामकाज पाच मिनिटांसाठी तहकूब केले.
कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतरही विरोधक आक्रमक झाले. नाना पटोले यांनी अध्यक्षांच्या आसनासमोर जाऊन जाब विचारला. पटोले यांना जागेवर जाऊन बसण्याच्या सूचना दिल्यानंतरही ते तिथून हलले नाहीत. शेतकऱयांचा अवमान करणाऱयांवर कारवाईचे आदेश द्या असा आग्रह त्यांनी धरला. त्यावेळी त्यांचा हात अध्यक्षांसमोरील राजदंडाला लागला. त्यामुळे अध्यक्षांनी त्यांना सभागृहातून एक दिवसासाठी निलंबित केले. या हुकूमशाहीचा निषेध नोंदवत विरोधी आमदारांनी सरकारविरुद्ध जोरदार घोषणा दिल्या.
रोज निलंबित केले तरी शेतकऱ्यांसाठी आवाज उठवत राहू
रोज निलंबित केले तरी शेतकऱयांसाठी आवाज उठवत राहू अशा इशारा विरोधी पक्षाच्या आमदारांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला. केंद्र आणि राज्य सरकारला माज आला आहे. त्यांचे आमदार आणि कृषिमंत्री शेतकऱयाला भिकारी समजतात. शेतकऱयांच्या बाजूने बोलेल त्याला सभागृहातून निलंबित करतात आणि जो शेतकऱयांविरोधात बोलेल त्याला सन्मानाने वागवतात. शेतकऱयांवर महायुती सरकार विविध पध्दतीने अन्याय करत आहेत. अपमानित करत आहे. ते विरोधी पक्ष कदापि सहन करणार नाही. एक दिवस काय रोज निलंबित केले तरी थांबणार नाही. उद्या पुन्हा शेतकऱ्यांचे प्रश्न मांडू. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शेतकऱयांची माफी मागितल्याशिवाय विरोधक शांत बसणार नाहीत, असे यावेळी नाना पटोले म्हणाले. शेतकऱयांना अवकाळीची नुकसानभरपाई, कर्जमाफी मिळालीच पाहिजे, असे ते म्हणाले.