त्या गोळ्या एअर गनच्या नव्हत्या? ओशिवरा गोळीबार प्रकरणी पोलिसांना प्रतीक्षा फॉरेन्सिक अहवालाची

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

ओशिवरा येथील सोसायटीमध्ये गोळीबाराची घटना रविवारी घडली. याचा तपास गुन्हे शाखेचे पोलीस करत आहेत. पोलिसांना प्रतीक्षा फॉरेन्सिक अहवालाची आहे. त्या गोळ्या एअर गनच्या नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

अंधेरीच्या ओशिवरा येथे एक इमारत आहे. त्या इमारतीच्या दुसऱ्या आणि चौथ्या मजल्यावरील दोन घरांवर गोळीबार करण्यात आला. या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा कोणी जखमी झाले नाही. गोळीबाराचा मोठा आवाज ऐकून इमारतीतील रहिवाशी आवारात जमा झाले. रहिवाशांना दोन गोळ्या सापडल्या. तपासणी केल्यावर त्यांना दोन्ही फ्लॅटच्या बाहेरील भिंतींवर आणि लाकडी चौकटीवर गोळ्यांचे निशाण आढळले. फ्लॅट मालकांनी गोळ्या पाहून पोलिसांना बोलावले. घटनेची माहिती मिळताच ओशिवरा पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी पोहोचला. पोलिसांनी संपूर्ण इमारत सील केली असून फॉरेन्सिक तज्ञांच्या मदतीने पुरावे गोळा केले जात आहेत. पोलिसांना प्रतीक्षा फॉरेन्सिक अहवालाची आहे. हल्लेखोराची ओळख आणि त्यामागील हेतू शोधण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे.