पीओकेमधील शारदा मंदिरावर पाकिस्तानी सैन्याचा कब्जा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पीओकेमधील शारदा मंदिर परिसरावर पाकिस्तानी सैन्यांनी कब्जा केला आहे. पाकिस्तानकडून करण्यात आलेले अतिक्रमण हटवण्यासाठी मंदिर बचाव समितीने शुक्रवारी केंद्रातील मोदी सरकारकडे मदत मागितली आहे. पाकिस्तानी सैन्यांकडून मंदिरावर अतिक्रमण करण्यात आले असून यात मोदी सरकारने तात्काळ हस्तक्षेप करावा, अशी मागणी सेव शारदा कमिटीचे संस्थापक रवींद्र पंडिता यांनी बंगळुरू प्रेस क्लबममध्ये बोलताना केली.

मंदिर परिसरात कॉफी होम उघडले
पाकिस्तानी सैन्यांनी जीर्ण-शीर्ण प्राचीन शारदा मंदिर परिसरात अतिक्रमण केले आहे. समितीच्या बाजूने कोर्टाने आदेश देऊनही पाकिस्तानी सैन्याकडून या ठिकाणी कॉफी होम उघडण्यात आले आहे. भाविकांना तीर्थयात्रेला जाण्यासाठी शारदा पीठ पुन्हा एकदा उघडण्यात यावे. जर पाकिस्तानी अधिकाऱयांनी आणि त्यांच्या सैनिकांनी कॉफी होमला हटवले नाही तर आम्ही नियंत्रण रेषा (एलओसी) पर्यंत मोर्चा काढू, असा इशारा पंडिता यांनी दिला आहे.